आदर्श व्यक्तिमत्त्वांचे आयुष्य फार विचित्र असते. त्यांच्या जीवनशैलीचे फार जवळून निरीक्षण केले जाते. समाज त्यांना एका विशिष्ट चौकटीतून पाहतो. आणि एखादी गोष्ट जर त्या चौकटीत बसणारी नसेल तर मात्र त्यांच्याच चाहत्यावर्गाकडून त्यांच्यावर टीकेची लाट उसळते. आजवर हा अनुभव मायकेल जॅक्सन, शेन वॉर्न, मडोना, जस्टिन बीबर यांसारख्या कित्येक कलाकारांनी घेतलेला आहे. अभिनेत्री अम्बर हर्डदेखील सध्या अशाच काहीशा विचित्र परिस्थितीचा सामना करते आहे. बहुधा म्हणूनच तिने या ‘आदर्श’पणाचा आता कंटाळा आला, असे उद्गार काढले आहेत. चाळीसपेक्षा जास्त यशस्वी व्यक्तिरेखा, शेकडो पुरस्कार, 60 हजारपेक्षा जास्त समाजमाध्यमांचे फॉलोअर्स बाळगणारी 31 वर्षीय अम्बर हर्ड आज हॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आज अनेक नवोदित कलाकार तिला आदर्श मानतात, परंतु अम्बरला आता ही लोकप्रियता नकोशी झाली आहे. सतत तिच्यावर लक्ष ठेवून राहणारे चाहते तिला नकोसे वाटतात. तिच्या लहानातल्या लहान गोष्टीचे ते अनुकरण करतात. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात बोलताना, वागताना तिला फार विचार करून वावरावे लागते. या सगळ्या परिस्थितीमुळे तिचे स्वातंत्र्यच तिच्यापासून कोणी हिरावून घेत असल्याचा भास तिला होतो
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews